मटार पनीर मसाला


मटार पनीर मसाला

साहित्य :-
  1. 2 मध्यम आकाराचे चिरलेले कांदे
  2. 5 ते 6 लसूण पाकळ्या 
  3. एक छोटा अद्रक चा तुकडा 
  4. एक लहान आकाराचा टोमॅटो बारीक चिरलेला 
  5. तेल आवश्यकतेनुसार
  6. एक चमचा धणे पावडर
  7. एक चमचा किचन किंग मसाला 
  8. एक चमचा लाल तिखट
  9. मीठ चवीनुसार 
  10. अर्धी वाटी फ्रोजन मटार
  11. 250 ग्रॅम पनीर स्मॉल साइज तुकडे केलेले
  12. एक चमचा कश्मीरी लाल तिखट
  13. छोटा अर्धा चमचा हळद 
  14. बारीक चिरलेली कोथिंबीर
  15. पाणी (आवश्यकतेनुसार)

कृती :-
  1. कढईत एक चमचा तेल घालून चिरलेला कांदालसूण पाकळ्या,अद्रक चा तुकडा घाला.आणि कांदा,लसूण ,अद्रक मध्यम आचेवर चांगले परतून घ्या. (सोनेरी रंग येईपर्यंत)
  2. नंतर त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घाला. टोमॅटोही चांगला परतून घ्या. (पाच मिनिटे झाकण ठेवून ) टोमॅटो  चांगले मऊ होईपर्यंत शिजवा. (जळणार नाही याची दक्षता घ्या)
  3. गॅस बंद करुन कढईतले सर्व मिश्रण थोडेसे थंड होऊ द्या.
  4. हे सर्व मिश्रण मिक्सरच्या जार मध्ये काढून घ्या व त्याची बारीक पेस्ट करून घ्या. (बारीक पेस्ट होण्यासाठी अगदी थोडेसे पाणी घालून मिक्सरमध्ये फिरवा पाणी जास्त घालू नका त्यामुळे त्या मसाल्याची चव जाईल)
  5. मसाला चांगला बारीक वाटून झाल्यानंतर एका कढाई मध्ये  तीन टेबलस्पून  तेल घाला. (तेलाच्या ऐवजी तुम्ही बटर रही वापरू शकता आवडत असल्यास) 
  6. त्यानंतर त्यात  बारीक केलेल्या मसाल्याची पेस्ट घाला. ती चांगली मध्यम आचेवर परतून घ्या.
  7. त्या मसाल्याला तेल सुटू लागल्यानंतर त्यामध्ये  एक चमचा धणा पावडर,अर्धा चमचा हळद ,एक चमचा किचन किंग मसाला  ,एक चमचा कश्मीरी लाल तिखट,  एक चमचा लाल तिखट, (तिखटाचे प्रमाण तुम्ही कमी-जास्त करू शकतात )मीठ चवीनुसार हे सर्व घालून नीट मसाला परतून घ्या. व परत झाकण ठेवून पाच मिनिटे शिजू द्या. (फक्त मसाला करपणार नाही याची काळजी घ्या)
  8. मसाला व्यवस्थित झाला की,  त्यामध्ये थोडेसे पाणी घाला. व मसाला परत व्यवस्थित हलवून घ्या. नंतर त्यामध्ये फ्रोजन वटाणा घाला. व तो पाच ते सात मिनिटे झाकण ठेवून शिजू द्या. ( फ्रोजन वटाणा ऐवजी जर तुम्ही सीजनल वटाणा घालत असाल  तर तो तुम्हाला  दहा ते पंधरा मिनिटे झाकण ठेवून शिजू द्यावा लागेल )
  9. नंतर त्यामध्ये  आवश्यकतेनुसार पाणी घाला. ग्रेव्ही जर घट्ट हवी असेल तर पाणी जास्त घालू नका. (एक ते दीड ग्लास पर्यंत पाणी घाला) व एक उकळी येऊ द्या.
  10. भाजीला उकळी आली की नंतर त्यामध्ये पनीर घाला (पनीर आधी घालू नका नाहीतर  ते जास्त शिजून तुटतील) (पनीर  सर्वात शेवटी घालायचे )
  11. परत एकदा सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. व दहा मिनिट ती ग्रेव्ही उकळू द्यायची. नंतर गॅस बंद करायचा व त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.

टिप्स :-
  1. मटार पनीर करताना पनीर सर्वात शेवटी घालावे नाहीतर पनीर जास्त शिजून तुटतात.
  2. कांदा तेलात परततांना त्यामध्ये थोडेसे मीठ घालावे असे केल्यास कांदा लवकर परतून होतो.
  3. मटार पनीर करताना जर तुम्ही सीजनल मटार वापरत असाल तर मटार शिजायला थोडा वेळ लागतो. त्यामुळे ते मटार दहा ते पंधरा मिनिटं झाकण ठेवून शिजू द्यावे. जर तुम्ही फ्रोजन मटार  वापरत असाल तर ते मध्यम आचेवर शिजायला पाच ते दहा मिनिटे लागतात.
  4. मटार पनीर करताना तुम्ही किचन किंग मसाला च्या ऐवजी कुठल्याही ब्रँडचा पनीर मसाला ही वापरू शकता.
By Amrurta's Kitchen 

Comments