सातपुड्यांच्या पातोड्या
साहित्य :- (पातोडी रस्सा करिता)
- अर्धा कप किसलेले सुके खोबरे
- तेल
- दोन मध्यम आकाराचे चिरलेले कांदे
- अर्धा तुकडा अद्रक
- ७ ते ८ लसूण पाकळ्या
- एक चमचा लाल तिखट
- एक चमचा किचन किंग मसाला
- चवीनुसार मीठ
- गरम पाणी
- अर्धा चमचा हळद
- एक चमचा धणे पावडर
- ३ ते ४ कमी तिखट लाल सुक्या मिरच्या
- १ ते २ काळी मिरी(हा खडा मसाला आहे)
- दालचिनीचा एक तुकडा (हा खडा मसाला आहे)
- २वेलची (हा खडा मसाला आहे)
- २ लवंग (हा खडा मसाला आहे)
- बारीक चिरलेली कोथिंबीर
- १ तमालपत्र
- एक चमचा बडीशेफ
साहित्य :- (पातोडी साठी)
- एक कप किसलेले सुके खोबरे
- एक कप बेसन पीठ
- दोन मोठे चमचे खसखस
- बारीक चिरलेली कोथिंबीर
- अर्धा चमचा तिखट
- पाव चमचा हळद
- चिमुटभर हिंग
- मीठ चवीनुसार
- तेल
- पाणी
कृती :- (पातोडी रस्सा साठी)
१. कढईत पहिले सर्व खडे मसाले आणि बडीशेफ भाजून घ्या.
२. नंतर किसलेले सुके खोबरे घालून छान लाल होईस्तोवर भाजून घ्या.( खोबरे जळणार नाही याची दक्षता घ्या)
3. भाजून झालेले सर्व खडे मसाले आणि बडीशेप व किसलेले सुके खोबरे मिक्सरच्या जार मध्ये घालून पहिले नीट वाटून घ्या.
४. त्याच कढईमध्ये थोडे तेल घाला. चिरलेला कांदा आणि अद्रक ,लसूण पाकळ्या घाला. आणि कांदा छान लाल होईपर्यंत मध्यम आचेवर भाजा.
५. भाजलेले कांदे ,आले, लसूण हे सर्व मिक्सरच्या जार मध्ये घालून व्यवस्थित वाटून घ्या. हे सर्व नीट वाटून झाल्यानंतर त्यामध्ये वाटलेले खोबरे व खडे मसाले एकत्र करा व ते सर्व मिश्रण परत एकदा व्यवस्थित बारीक वाटून घ्या. (मसाल्याच्या बारीक पेस्टसाठी थोडेसे पाणी घाला म्हणजे मिश्रण व्यवस्थित बारीक वाटले जाईल )(मसाल्याच्या मिश्रणावेळी आपण किमान पाणी वापरत असल्याचे सुनिश्चित करा.)
६. कढईत तीन टेबल्स्पून तेल घालून त्यात १ तमालपत्र आणि सर्व वाटलेला मसाला घाला. वाटलेला मसाला चांगला तीन ते चार मिनिट तेलात परतून घ्या. ( जोवर त्या मसाल्याला तेल सुटत नाही तोवर ) (मसाला जळणार नाही याची दक्षता घ्या)
७. मसाला नीट परतवुन झाल्यानंतर व त्याला तेल सुटू लागल्यानंतर नंतर त्यामध्ये एक चमचा लाल तिखट घाला. (तिखट तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे कमी-जास्त घालू शकता) नंतर त्यामध्ये एक चमचा किचन किंग मसाला,अर्धा चमचा हळद घालावी.
८. सर्व मसाले घालून झाले की एक दीड ग्लास गरम पाणी घाला. व नीट ढवळून घ्या.(गरम पाणी तुम्ही तुमच्या सोयीने कमी-जास्त करू शकता) ( तुम्हाला भाजीचा रस्सा कसा हवा आहे घट्ट हवा असेल तर पाणी कमी घालावे आणि पातळ हवा असेल तर पाणी जास्त घालावे)
११. भाजीला एक उकळी आल्यानंतर चवीनुसार मीठ घालावे.आणि चांगले ढवळावे. दोन ते तीन मिनिट भाजी उकळू द्यावी.
१२. एकदा का भाजीचा रस्सा ला थोडा घट्टपणा आला की गॅस बंद करावा. त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी.
ही झाली कृती पातोडी रस्सा बनवण्याची ,आता आपण बघुया ......सातपुड्याची पातोडी कशी बनवायची ते......
कृती :- (सातपुड्याची पातोडी)
1. एका खोल भांड्यात एक कप बेसन पीठ ,अर्धा चमचा लाल तिखट ,पाव चमचा हळद ,मीठ चवीपुरते ,चिमुटभर हिंग हे सर्व घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. नंतर त्यामध्ये एक ग्लास पाणी घालून पीठ भिजवून घ्या. आपण डोसे करताना ज्याप्रमाणे पिठाची कन्सिस्टन्सी ठेवतो, तीच कन्सिस्टन्सी हे पीठ भिजवताना ठेवायची. पिठाची कन्सिस्टन्सी पाहून पाणी तुम्ही कमी-जास्त करू शकता. (खूप पातळ पीठ नाही भिजवायचे)
2. पातोडी साठी पीठ भिजवून झाले की दहा मिनिटं सेट करायला ठेवायचे.... पातोडी चे पीठ सेट होतय तोपर्यंत... आपण पातोडी मधले सारण कसे बनवायचे याची कृती बघूया......
3. कढईमध्ये मध्यम आचेवर एक कप किसलेले सुके खोबरे व्यवस्थित भाजून घ्यावे सुके खोबरे भाजून झाले की एका प्लेटमध्ये काढून घ्यावे.
4. त्याच कढईमध्ये मध्यम आचेवर दोन चमचे खसखस व्यवस्थित भाजून घ्यावी व गॅस बंद करावा.
5. भाजलेले खोबरे आणि भाजलेली खसखस एकत्र मिक्स करून त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यावे अगदी किंचितसे मीठ घालावे अशा पद्धतीने पातोडी मध्ये भरायचे सारण रेडी करायचे.
6. सारण तयार करून झाल्यानंतर मध्यम आचेवर नॉनस्टिक पॅन गरम करायला ठेवावा. पॅन गरम झाला की,
त्यावर थोडे तेल सोडून ते व्यवस्थित पसरून घ्यावे. पातोडी साठी भिजवलेले पीठ पळी मध्ये घेऊन आपण डोसे करतो, त्याप्रमाणे ते पीठ पॅनवर गोल पसरवून घ्यावे. व आजू बाजूने तेल सोडून पातोडीची एक बाजू व्यवस्थित शिजू द्यावी.एक बाजू व्यवस्थित शिजली कि दुसऱ्या बाजूने पलटुन घ्यावे.
7. दुसरी बाजू व्यवस्थित शिजली की आपण तयार केलेले पातोडी चे सारण पातोडीवर सगळीकडून व्यवस्थित पसरवून घ्यायचे.
8. पॅनवर असतानाच पातोडी चा रोल करून घ्यायचा. व नंतर गॅस बंद करायचा.पातोडी चा रोल करून झाल्यानंतर रोल चे सुरीने तीन भाग करायचे. व ते आपण केलेल्या पातोडी च्या रस्सांमध्ये सोडायचे. अशा पद्धतीने सातपुड्यांची पातोडी तयार........
टिप्स:
१. कांदा परतताना त्यामध्ये किंचित मीठ घालावे असे केल्यास कांदा लवकर परतून होतो.
२. जर भाजी मध्ये तुम्हाला खडे मसाले घालायचे नसतील त्याऐवजी तुम्ही गरम मसाला पावडर ही घालू शकता. गरम मसाला पावडर ही मार्केट मध्ये इझी ली अवेलेबल आहे.
By Amruta's Kitchen

Awesome....
ReplyDeleteThank u !!
ReplyDelete