गव्हाच्या शेवयांचा उपमा
गव्हाच्या शेवया तुम्हाला मार्केटमध्ये सहज उपलब्ध आहेत. बऱ्याच ठिकाणी घरगुती तत्त्वावर गव्हाच्या शेवया बनवण्याचे उद्योग चालतात.हल्ली मैद्याच्या नूडल्स च्या तुलनेत हा पदार्थ खूप पौष्टिक मानला जातो. खास करून लहान मुलांसाठी. भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी हा पदार्थ वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो.या पदार्थांमध्ये आपण आपल्याला हव्या असणाऱ्या भाज्यांचा समावेश करू शकतो.(उदाहरणार्थ: बारीक चिरलेली शिमला मिरची ,मक्याचे दाणे,बारीक चिरलेला कोबी ,बारीक चिरलेला गाजर )हा पदार्थ पौष्टिक बनवू शकतो.चला तर मग बघूया हा पदार्थ कसा बनवायचा...
साहित्य:
गव्हाच्या शेवया तुम्हाला मार्केटमध्ये सहज उपलब्ध आहेत. बऱ्याच ठिकाणी घरगुती तत्त्वावर गव्हाच्या शेवया बनवण्याचे उद्योग चालतात.हल्ली मैद्याच्या नूडल्स च्या तुलनेत हा पदार्थ खूप पौष्टिक मानला जातो. खास करून लहान मुलांसाठी. भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी हा पदार्थ वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो.या पदार्थांमध्ये आपण आपल्याला हव्या असणाऱ्या भाज्यांचा समावेश करू शकतो.(उदाहरणार्थ: बारीक चिरलेली शिमला मिरची ,मक्याचे दाणे,बारीक चिरलेला कोबी ,बारीक चिरलेला गाजर )हा पदार्थ पौष्टिक बनवू शकतो.चला तर मग बघूया हा पदार्थ कसा बनवायचा...
साहित्य:
- एक मोठी वाटी गव्हाच्या शेवया
- एक मध्यम आकाराचा (कांदा बारीक चिरलेला)
- एक छोटा टोमॅटो (बारीक चिरलेला )
- एक छोटा चमचा जिरे
- एक मोठा चमचा लसूण अद्रक ची पेस्ट
- एक टेबल स्पून लाल तिखट
- मीठ चवीनुसार
- अर्धा छोटा चमचा हळद
- एक छोटा चमचा धने पावडर
- चिमुटभर हिंग
- अर्धा छोटा चमचा टोमॅटो केचप ( आवडत असल्यास घालावे)
- एक छोटी वाटी फ्रोजन वटाणा
- एक छोटी वाटी मक्याचे दाणे (असतील तर घालावे)
- बारीक चिरलेली कोथिंबीर
- तेल (आवश्यकतेनुसार )
- एक ते दीड ग्लास गरम पाणी
- छोटा लहान चमचा साखर (आवडत असेल तर)
कृती:
1.पहिले एका कढईमध्ये शेवया मध्यम आचेवर भाजून घ्याव्या. ( शेवया भाजतांना त्या एकसारखे हलवत राहणे गरजेचे आहे.नाहीतर शेवया करपू शकतात.)
2. शेवया मध्यम आचेवर चांगल्या भाजून झाल्या की गॅस बंद करावा. व त्या शेवया एका प्लेटमध्ये काढून घ्याव्या.
3.नंतर त्याच कढईमध्ये फोडणीसाठी आवश्यकतेनुसार तेल घालावे (शेवयांचा अंदाज घेऊन)
4.तेल गरम झाले कि प्रथम जिरे घालावे. जिरे तडतडले की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालावा, चिमूटभर हिंग घालावे. नंतर त्यामध्ये फ्रोजन वटाणा घालावा. (वटाणा फ्रोजन असल्यामुळे तो शिजायला कमी वेळ लागतो जर तुम्ही फ्रोजन वटाणा वापरत नसाल तर तुम्हाला वटाणा पाच मिनिटं झाकण ठेवून शिजू द्यावा लागेल ) फ्रोजन वटाणा ला इतका वेळ लागत नाही तो लगेच शिजतो.
5. नंतर त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालावा. मक्याचे दाणे असतील तर ते हि घालावेत. व हे सर्व झाकण ठेवून दोन-तीन मिनिटे शिजवून घ्यावे. (अधून मधून झाकण काढून हलवून बघावे)
6. नंतर त्यामध्ये आले-लसूण पेस्ट टोमॅटो केचप अगदी थोडेसे( टोमॅटो केचप ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचे असल्यास तुम्ही घालू शकता )आपण ऑलरेडी टोमॅटो चिरून घातलेला आहे.
7.हळद घालावी.धने पूड घालावी.चवीप्रमाणे मीठ, चवीप्रमाणे साखर घालावे.व सर्वात शेवटी तेलामध्ये लाल तिखट घालावे. (कारण तिखट आधी जर तेलात घातले तर ते जळण्याची शक्यता असते )
8.नंतर त्यामध्ये भाजलेल्या शेवया घालून हलक्या हाताने हलवून घ्यावे जेणेकरून सगळा मसाला शेवयांना लागेल. (शेवया तुटणार नाहीत याची दक्षता घ्यावी)
9. नंतर त्यामध्ये अंदाज घेत थोडे थोडे गरम पाणी घालावे. (शेवया बुडतील इतके )व एकदा परत व्यवस्थित ढवळून घ्यावे. व मध्यम आचेवर झाकण ठेवून 5 ते 7 मिनिट शिजू द्यावे. मधून मधून झाकण उघडून बघावे त्यावेळेस जर तुम्हाला पाणी कमी वाटत असेल तर तुम्ही थोडे गरम पाणी अजुन त्यात घालू शकता. (गरम पाणी घालताना पाणी जास्त पडणार नाही याची दक्षता घ्या) पाणी जर जास्त झाले तर शेवया चिकट होतील, मोकळ्या होणार नाहीत त्यामुळे अंदाज घेत पाणी घालावे.
10. पाच-सात मिनीटांनी शेवया व्यवस्थित शिजल्या, की गॅस बंद करावा.व बारीक चिरलेली कोथिंबीर त्यावर घालावी.
अशा रीतीने तुमच्या पौष्टिक गव्हाच्या शेवया खाण्यासाठी तयार......
टिप्स :
1.शेवया भाजताना त्या करपणार नाहीत. याची काळजी घ्यावी त्यासाठी त्या सतत हलवणे गरजेचे आहे.
2.शेवया करताना त्यामध्ये तुम्ही जर फ्रोजन वटाणा ऐवजी सीजनल वटाणा वापरत असाल तर तेलामध्ये प्रथम तो वटाणा घालावा.व पाच मिनिटे झाकण ठेवून शिजू द्यावा. नंतर त्यामध्ये चिरलेला कांदा घालून तो शिजू द्यावा.( प्रथम कांदा घालू नये)
3. मक्याचे दाणे जर तुम्हाला घालायचे असतील तर तेही तुम्हाला पाच मिनिटं झाकण ठेवून शिजू द्यावे लागतील.
4.टोमॅटो केचप यामध्ये ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालणार आहे.कारण यामध्ये आपण बारीक चिरून टोमॅटो घातलेला आहे (जर आवडत असेल तर टोमॅटो केचप घालावे चव छान येते)
5. शेवया अजून छान होण्यासाठी टेस्टी होण्यासाठी त्यामध्ये तुम्ही थोडासा पावभाजी मसाला ही घालू शकता. त्यांनी पण तुमच्या शेवयांना खूप छान चव येईल.
6. शेवया शिजत असताना त्यामध्ये गरम पाणी अंदाज घेतघेत घालावे.जर पाणी जास्त झाले तर शेवया चिकट होतील.
7.तुम्ही शेवया मध्ये बारीक चिरलेली शिमला मिरची, बारीक चिरलेला कोबी, आवडीप्रमाणे घालू शकता. असे केल्यास शेवया अधिक पौष्टिक होतील. किंवा वरतून थोडेसे चीज किसून तयार शेवयांवर टाकले की ,लहान मुलेही हया शेवया आवडीने खातील.
8. शेवया करताना लाल तिखटाऐवजी तुम्ही हिरव्या मिरचीचा सुद्धा वापर करू शकता.
By Amruta's Kitchen...
Comments
Post a Comment