बेरीच्या वड्या




बेरीच्या वड्या

          आपण तूप करताना त्यापासून जी बेरी निघते ती खूप खूप पौष्टिक असते. बऱ्याचदा ती बेरी खाल्ली जात नाही. काहीजण त्या मध्ये दूध साखर घालून खातात. बेरी मध्ये खूप प्रमाणात पौष्टिक घटक असतात. ही बेरी बरीच लहान मुलं मोठी माणसं आवडीने खात नाहीत त्याकरिता ती टेस्टी कशी करता येईल..?  तर त्या पासून आपण गोड अशा वड्या बनवल्या तर लहान मुलं आणि मोठी माणसं ही नक्कीच या वड्या आवडीने खातील.आणि त्या अधिक पौष्टिक बनवण्यासाठी त्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स घालू शकतो. चला तर मग बघुया बेरी ची वडी कशी बनवायची ते...!

साहित्य :-

  • एक कप बेरी
  • पाव कप साखर 
  • अर्धा कप दूध
  • एक छोटा चमचा इलायची पूड 
  • पाव कप शेंगदाण्याचा कूट

कृती :-

1.प्रथम एका भांड्यात बेरी मोकळी करून घ्यावी. 
2.एक नॉन स्टिक पॅन घ्यायचा. गॅस मध्यम आचेवर चालू करायचा.
3. नॉन स्टिक पॅन मध्ये मोकळी केलेली बेरी,साखर (साखर तुम्ही कमी-जास्त प्रमाणात घेऊ शकतात तुम्हाला कितपत गोड हवे आहे त्याप्रमाणे )शेंगदाणा कूट, दूध,व इलायची पूड हे सर्व एकत्र करून नीट मिक्स करून घ्यायचे.
4.या सर्वांचे मिक्सिंग झाल्यानंतर हळूहळू तिचा पाक होण्यास सुरुवात होईल. (आपण त्यात साखर घातल्यामुळे) 
5. हे सर्व मिश्रण एकसारखे हलवत राहायचे जोपर्यंत त्याचा गोळा तयार होत नाही व ते सर्व मिश्रण एकजीव होत नाही.
6.मिश्रण थोडेसे घट्ट व्हायला लागले व एकत्र यायला लागले की गॅस बंद करावा.
7. एक छोटी वाटी घेऊन ते मिश्रण गरम असतानाच त्या मिश्रणाला वाटीचा आकार देऊन वाटीच्या आकाराच्या वड्या पाडाव्यात.
8. ड्रायफ्रूट घालून डेकोरेट करावे.
9. किंवा एका ताटात हे मिश्रण घेऊन तुम्ही तुपाचा हात लावून मिश्रण गरम असतानाच थापून घ्यावे.व अर्धा तास थंड करायला ठेवावे.थंड झाल्यानंतर त्याच्या वड्या पाडाव्यात.

टिप्स :-

1.माझ्याकडे छोटी डिझाईन ची वाटी असल्यामुळे मी ते मिश्रण त्या वाटीत घेऊन  त्याला वाटीचा आकार दिला. तुमच्याकडे दुसरी कुठलीही वाटी असेल किंवा दुसरा कुठलाही साचा असेल त्याचा, त्या वडीला तुम्ही आकार देऊ शकता. साचा नसल्यास तुम्ही त्या तुम्ही ते मिश्रण ताटात घेऊन थापून ते थंड झाल्यानंतर त्याच्या वड्या पाडू शकता.
2. वड्या करताना बेरी ही फ्रेश हवी खूप दिवसांची बेरी असेल तर तिला आंबट वास येईल
3.  किंवा तुम्ही कुठल्या प्रकारचे दूध घेता त्यावर ही बेरी अवलंबून असते तुमची बेरी जितकी चांगली असेल तितक्या तुमच्या वड्या टेस्टी होतील.

बेरीच्या वड्यांची रेसिपी ही आमच्या( Family Friend)अर्चना (भाभी) बुरड यांच्याकडून मी शिकले आहे.
So Courtesy to dear Archana Bhabhi for this recipe.

By Amruta's Kitchen

Comments

  1. मी बनवून पहिली ही रेसिपी आणि फार टेस्टी झाल्यात वड्या. Thank you. अशाच नवं नवीन रेसिपी शेअर करत रहा.

    ReplyDelete

Post a Comment