सुकी बटाटा भाजी ( महाराष्ट्रीयन पद्धतीने )
साहित्य :-
- चार ते पाच मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले
- एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला
- पाच ते सहा कमी तिखट मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या
- एक छोटा अद्रक चा तुकडा
- सहा ते सात लसून पाकळ्या
- मीठ चवीनुसार
- अर्धा लहान चमचा हळद
- एक चमचा धने
- एक चमचा लिंबाचा रस
- साखर चवीपुरता
- तीन चमचे तेल
- सहा ते सात कढिपत्त्याची पानं
- एक लहान चमचा जिरे
- एक लहान चमचा मोहरी
- चिमुटभर हिंग
- एक चमचा कसूरी मेथी
- बारीक चिरलेली कोथिंबीर
कृती :-
1.लसूण अद्रक धने हे खलबत्यात कुटून घ्यावे.
2.बटाटे उकडून झाल्यानंतर त्याची साल काढून छोट्या छोट्या फोडी करून घ्याव्यात.
3.कढाई मध्ये तीन चमचे तेल मध्यम आचेवर गरम करायला ठेवावे.तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये पहिले कुटून घेतलेले लसूण, अद्रक, धने पेस्ट टाकावी. नंतर त्यामध्ये जिरे मोहरी चिमूटभर हिंग घालावा.
4. बारीक चिरलेला कांदा घालावा. कांदा थोडासा गुलाबी झाला की त्यामध्ये कढीपत्त्याची पाने, हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या घालाव्यात. (हिरवी मिरची तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी-जास्त करू शकता.) सर्व मिश्रण व्यवस्थित परतून घ्यावे. चवीपुरते मीठ घालावे. हळद घालावी.
5. सर्व व्यवस्थित परतून झाले की चिरलेल्या बटाट्याच्या फोडी घालाव्यात. व परत एकदा सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. बटाट्याच्या फोडींना मसाला व्यवस्थित लागला गेला पाहिजे.
6.त्यानंतर त्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस घालावा. थोडीशी साखर घालावी व व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. व कढईवर झाकण ठेवून पाच मिनिटं वाफ द्यावी. असे केल्याने भाजीचा मसाला व्यवस्थित शिजतो चांगला एक जीव होतो.
7. पाच मिनिटे झाली की गॅस बंद करावा. भाजीवर वरतून कसुरी मेथी हातावर क्रश करून टाकावी. त्यानंतर चिरलेली कोथिंबीर घालावी.
9.आपली स्वादिष्ट सुकी बटाटा भाजी तयार..... बटाटा भाजी तुम्ही पुरी सोबत किंवा फुलके यांसोबत खाऊ शकता ही भाजी पुरी सोबत अधिक टेस्टी लागते.
टिप्स:-
1. कांदा परतताना त्यामध्ये थोडेसे मीठ घालावे असे केल्यास कांदा लवकर परतून होतो
2.तुम्ही या भाजीला अधिक चवदार करण्यासाठी वाटलेला पुदिना ही घालू शकता. भाजीला टेस्ट मस्त येते.
3. भाजी मध्ये उडदाची डाळ घालू शकता. भाजीला टेस्ट मस्त येते. उडदाची डाळ ही तेलात परतवून घ्यायची.आणि मग बारीक चिरलेला कांदा परतून घ्यायचा.
By Amruta's Kitchen

Comments
Post a Comment