मँगो मस्तानी


मँगो मस्तानी 
      
        मँगो मस्तानी हे पुण्यातील सर्वाधिक लोकप्रिय पेय आहे. मँगो मस्तानी चा जन्मच पुण्यात झाला. पुण्या सोबतच महाराष्ट्रातील इतर शहरांमध्येही मँगो मस्तानी तितकीच लोकप्रिय आहे. मँगो मस्तानी जितकी दिसायला छान दिसते तेवढीच  तिची टेस्ट ही छान लागते. मँगो मस्तानी ही बनवायला ही अतिशय सरळ साधी सोपी आहे.उन्हाळ्याच्या सीझनमध्ये लहान मुलांना हे पेय बनवून दिल्यास त्यावर वरतून ड्रायफ्रूट टाकून दिल्यास अधिक हेल्दी असे पेय बनते.

साहित्य :-
  • तीन हापूस आंबे( पिकून तयार असलेले )
  • दोन कप तापवून कोमट केलेले दूध
  • तीन ते चार चेरी सजावटीसाठी
  • दोन ते तीन टेबलस्पून टूटीफ्रूटी सजावटीसाठी
  • आंब्याच्या कापलेल्या छोट्या  फोडी सजावटीसाठी
  • ड्रायफ्रूट पिस्ता काजू बदाम यांचे हलकेसे पातळ केलेले काप सजावटीसाठी 
  • साखर आवश्यकतेनुसार ( तुम्ही त्यामध्ये  मधवापरू शकता आवडत असल्यास)
  • व्हॅनिला किंवा मॅंगो आईस्क्रीम चे तीन ते चार स्कूप
  • बर्फाचे तुकडे (बर्फाचे तुकडे घालायचे नसतील तर मस्तानी झाल्यानंतर थोडावेळ फ्रीजमध्ये ठेवावी)

कृती :-

1. आंब्याचा रस काढून त्यामध्ये साखर घालून ते मिक्सरच्या जार मध्ये घालून ब्लेंड करून घ्यावी. नंतर त्यामध्ये दूध घालून परत सर्व व्यवस्थित ब्लेंड करून घ्यावे. आंब्याच्या रसाची कन्सिस्टन्सी पाहून दूध कमी जास्त करावे.आंबा आंब्याचा रस जर गोड असेल तर साखरेचे प्रमाणही त्याप्रमाणे कमी-जास्त करावे.

2. नंतर काचेच्या ग्लासमध्ये हे सर्व मिश्रण अर्धा ग्लास भरेल इतकं भरावे, पूर्ण ग्लास भरू नये. नंतर त्यावर व्हॅनिला किंवा मॅंगो आइस्क्रीमचा एक स्कूप घालावा.

3. नंतर त्यावर पातळ स्लाइस केलेले पिस्ते बदाम काजू चे तुकडे घालावेत. आंब्याच्या कापलेल्या बारीक फोडी घालाव्यात.

4. नंतर त्यावर टूटीफ्रूटी ने गार्निश करावे.

5. नंतर  आईस क्रीम स्कूप च्या टॉप ला चेरी ठेवून गार्निश करावे. झाली तुमची मँगो मस्तानी तयार...... मँगो मस्तानी चा आस्वाद तुम्ही चमच्याच्या साह्याने किंवा स्ट्रॉ च्या साह्याने घेऊ शकता......


टिप्स :-
1. मँगो मस्तानी बनवताना शक्यतो हापूस आंब्याचा चा वापर करावा हापुस आंब्यामुळे मॅंगो मस्तानीला टेस्ट छान येते.
2. मँगो मस्तानी बनवताना तुम्ही साखरेऐवजी मध याचाही वापर करू शकता.

By Amruta's Kitchen

Comments