आमरस
साहित्य:-
- दोन ते तीन हापूस आंबे पिकलेले
- दोन ते तीन चमचे पिठीसाखर
- एक चमचा इलायची पूड
- अर्धा कप तापवून कोमट केलेले दूध
- तीन ते चार केशर काड्या (ऑप्शनल आहे)
- आंब्याचे चौकोनी आकाराच्या केलेल्या फोडी (सजावटीसाठी)
कृती:-
1.पहिले एका खोल भांड्यात आंब्याचा रस(Pulp)काढून घ्यावा.
2.नंतर तो आंब्याचा काढलेला रस मिक्सरच्या जार मध्ये ओतून त्यात 2 ते 3 चमचे पिठीसाखर, एक चमचा इलायची पुड ,अर्धा कप दूध
( दुधाची कन्सिस्टन्सी तुम्ही कमी-जास्त करू शकता), 1 ते 2 केशर काड्या हे सर्व घालून ब्लेंड करून घ्यायचे.
3. नंतर हे तयार झालेले मिश्रण एका मोठ्या वाटीत काढून घ्यायचे. व त्यावरती आंब्याचे केलेले चौकोनी काप व केशर काड्या ठेवून सजावट करायची.
टिप्स:
1. आमरस तयार करण्यासाठी तुम्ही कुठल्याही प्रकारचा आंबा वापरू शकता. मी इथे हापूस आंबा वापरला आहे. हापूस आंब्याने आमरसला टेस्ट खूप मस्त येते.
2. आंबा जर जास्त गोड असेल, त्याप्रमाणे तुम्ही पिठी साखरेचे प्रमाण कमी जास्त करु शकता. जर तुम्हाला पिठी साखर घालायची नसेल ,त्याऐवजी तुम्ही त्यात मध ही घालू शकता.
3. आमरस करताना केशर काड्या असतील तर घालाव्यात नाहीतर नाही घातल्या तरी चालतील
By Amruta's Kitchen

Comments
Post a Comment