गिलक्याचे भरीत...

गिलक्याचे भरीत...
साहित्य :-
  1. पाव किलो गिलके
  2. एक मोठा बारीक चिरलेला कांदा
  3. सात-आठ लसूण पाकळ्या
  4. शेंगदाणे
  5. काजू (बारीक तुकडे केलेले)
  6. मीठ चवीपुरते
  7. एक चमचा लाल तिखट 
  8. अर्धा चमचा हळद 
  9. अर्धा चमचा धणा पावडर
  10. अर्धा चमचा गरम मसाला पावडर
  11. चिमुटभर साखर
  12. फोडणीसाठी तेल
  13. एक लहान चमचा जिरे
  14. एक लहान चमचा मोहरी
  15. चिमुटभर हिंग
  16. कढीपत्ता

कृती :-
  1. गिलके स्वच्छ धुवून त्याची साल काढून बारीक फोडी करून घ्याव्यात. एका पातेल्यात गिलक्याच्या फोडी बुडतील एवढेच पाणी घालावे व त्या फोडी गाळ होईपर्यंत मध्यम आचेवर शिजवून घेऊन स्मँश करून घ्याव्या.
  2. एका कढईमध्ये मध्यम आचेवर दोन मोठे चमचे  तेल घ्यावे. तेल व्यवस्थित गरम झाले की त्यामध्ये जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता, शेंगदाणे, काजूचे तुकडे हे घालून  व्यवस्थित परतून घ्यावे. शेंगदाणे व काजूचे तुकडे  लाल सर सोनेरी रंगाचे झाल्यावर,  त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा,लसुण घालावा.
  3. कांदा लसूण व्यवस्थित परतला कि त्यामध्ये हळद,धना पावडर,लाल तिखट,गरम मसाला पावडर, चवीपुरते मीठ, साखर हे सर्व घालावे परत एकदा व्यवस्थित परतून घ्यावे. त्यानंतर त्यामध्ये शिजवून स्मॅश करून घेतलेले गिलके घालावे. व्यवस्थित दोन ते तीन मिनिटं मध्यम आचेवर परतून घ्यावे. आपण गिलके आधीच शिजवल्या मुळे दोन ते तीन मिनिटेच परतून घ्यायचे आहेत. व्यवस्थित परतून झालं की गॅस बंद करायचा व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गिलके भरताचा पोळी किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत आस्वाद घ्यावा.

टिप्स :- 
  1. बाजारातून गिलके खरेदी करताना बारीक असे कोवळे गिलके खरेदी करावेत. जाड गिलके घेऊ नयेत.  बऱ्याच वेळा जाड गिलके हे कडू निघतात व त्यामुळे गिलक्याचे भरीत  कडू होऊ शकते. म्हणून गिलके खरेदी करताना ही काळजी जरूर घ्यावी.
  2. कांदा फोडणीला घालते वेळेस त्यामध्ये थोडेसे मीठ घालावे. कांदा हा लवकर शिजतो.
  3. गिलक्याच्या फोडी शिजवताना त्यामध्ये फोडी बुडतील इतकेच पाणी घाला. जास्त पाणी घालू नका. जास्त पाणी घातल्यास भरीत पांचट होऊन चवीला चांगले लागणार नाही.
By Amruta's Kitchen 

Comments